संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? उकल :1 ते 100 पर्यंत 74 संयुक्त संख्या आहेत. 2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे 3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे. 4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती? उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10 आहे. 5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15 आहे
Comments
Post a Comment