Skip to main content
कोन:
*लघुकोन:0°पेक्षा मोठा व 90° पेक्षा कमी मापाच्या कोनाला लघुकोन म्हणतात.
*काटकोन:90°मापाच्या कोनाला काटकोन म्हणतात.
*विशालकोन:90°पेक्षा मोठा व 180°पेक्षा लहान मापाच्या कोनाला विशालकोन म्हणतात.
1)कोन मोजण्याचे साधन कोणते?
उकल:कोनमापक
2)प्रत्येक कोनाला किती शिरोबिंदू असतात?
उकल प्रत्येक कोनाला एक शिरोबिंदू असतो.
3)प्रत्येक कोनाला किती भुजा असतात?
उकल:प्रत्येक कोनाला दोन भुजा असतात.
4)0° पेक्षा मोठा व 90° पेक्षा कमी मापाच्या कोनाला ….कोन म्हणतात.
उकल: लघुकोन
5)कोनाचे नाव किती प्रकारात लिहू शकता?
उकत : तीन
6)काटकोनाचे माप किती असते?
उकल: 90°
7)50°मापाच्या कोनाचा प्रकार सांगा?
उकल : लघुकोन
8)कोनमापकाच्या व्यासाला काय म्हणतात ?
उकल संदर्भरेघ किंवा तळरेघ
9)कोनमापकाच्या संदर्भरेघेमुळे किती अंशाचा कोन तयार होतो?
उकल:180°
10)110° मापाच्या कोनाचा प्रकार सांगा?
उकल विशालकोन

Comments

Popular posts from this blog

संयुक्त संख्या: दोन पेक्षा जास्त विभाजक असलेल्या संख्यांना संयुक्त संख्या म्हणतात. 1)1 ते 100 पर्यंत संयुक्त संख्या किती आहेत? उकल :1 ते 100 पर्यंत  74 संयुक्त संख्या आहेत. 2) सर्वात लहान धन संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन संयुक्त संख्या 4 आहे 3)सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या कोणती? उकल : सर्वात लहान धन विषम संयुक्त संख्या 9 आहे. 4) सर्वात लहान दोन अंकी सम संयुक्त ।संख्या कोणती? उकल :सर्वात लहान दोन अंकी सम संख्या 10 आहे. 5)सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या कोणती? उकल: सर्वात लहान दोन अंकी संयुक्त विषम संख्या 15 आहे
1) 1 ते 50 पर्यंत किती मूळ संख्या आहेत? उकल:1 ते 50 पर्यंत 15 मूळ संख्या आहेत 2) एकमेव  सम मूळ संख्या कोणती? उकल: 2  ही एकमेव सम मूळ संख्या आहे 3) 1 ते 20 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल:1 ते 20 पर्यंतच्या संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19= 77 4) 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 50 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47= 328 5) 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज किती? उकल: 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्यांची बेरीज =2+3+5+7+11+13+17+19+23+29+31+37+41+43+47+53+59+61+67+71+73+79+83+89+97= 1060 6) मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा किती संख्या आहेत? उकल: मूळ संख्यांची अदलाबदल केली असता मूळ संख्याच मिळते अशा 4 संख्या आहेत.{(13,31),(17,71),(37,73),(79,97)}
1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.