विषय:- गणित इयत्ता :- आठवी
घटक :- १) काळ काम
श्री. यशवंत टकले (विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे )
1) रामला एक काम करायला 12 दिवस लागतात. तेच काम पूर्ण करण्यास शामला 24 दिवस लागतात. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील?
उकल:A=12. B=24
दोघांना काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस=A×B/A+B
= गुणाकार /बेरीज
= 12×24/12+24
=12×24/36
=24/3
= 8 दिवस
A) राम एक काम 20 दिवसात करतो.तेच काम शाम 30दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? ( उकल 12)
B) राम एक काम 15 दिवसात पूर्ण करतो. तेच काम शाम 10 दिवसात पूर्ण करतो.तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील? (उकल 6)
C) राम एक काम 40 दिवसात पूर्ण करतो.तेच काम शाम 60 दिवसात पूर्ण करतो.तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ? (उकल 24)
D) राम एक काम 30 दिवसात पूर्ण करतो.तेच काम शाम 45 दिवसात पूर्ण करतो.तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?(उकल 18)
Comments
Post a Comment