Skip to main content
8
शतमान (शेकडेवारी)
1)एका वस्तूची किंमत 20% ने वाढल्याने वस्तूचा खप 25% ने कमी झाला.तर उत्पन्नात शेकडा किती फरक पडेल?
उकल: वस्तूची किंमत 100
     वस्तूचा खप 100
उत्पन्न=100×100=10000
नंतरची किंमत =120
नंतरचा खप=75
नंतरचे उत्पन्न =120×75=9000
घट=10000-9000
       =1000
शेकडा घट=100×घट/सुरुवातीचे उत्पन्न
                 =100×1000/10000
                   =10% घट
पद्धत 2
20% वाढ=100+20=120=12.0
25%घट=100-25=75=7.5
12×7.5-100
=90-100
=-10
 =10%घट    (धन चिन्ह वाढ /ऋण चिन्ह घट)
2)एका वस्तूची किंमत 30% ने वाढल्याने वस्तूचा खप 35% ने कमी झाला.तर उत्पन्नात शेकडा किती फरक पडेल?(उकल 15.5% घट)

3)एका वस्तूची किंमत 10% ने वाढल्याने वस्तूचा खप 15% ने कमी झाला.तर उत्पन्नात शेकडा किती फरक पडेल?(उकल 6.5%घट)
4)एका वस्तूची किंमत 20% ने वाढल्याने वस्तूचा खप 10% ने कमी झाला.तर उत्पन्नात शेकडा किती फरक पडेल?(उकल 8% वाढ)

5)एका वस्तूची किंमत 20% ने वाढल्याने वस्तूघा खप 15% ने कमी झाला.तर उत्पन्नात किती फरक पडेल?(उकल 2% वाढ)
 

Comments

  1. 120ला 10ने भागले=12.0
    75ला 10ने भागले=7.5
    म्हणजे 10000चे 100रुपांतर बरोबर आहे सर

    ReplyDelete

Post a Comment