Skip to main content
विषय:- गणित   इयत्ता :- आठवी   घटक :- 5) काळ काम
श्री. यशवंत टकले (विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे )

1) 15 मजुर रोज   8 तास काम करुन एक काम  18 दिवसात पूर्ण करतात तेच   काम  16 मजूर 9 तास काम  करुन किती दिवसात पूर्ण करतील ?
उकल:    M1 =15. , T1=8 , D1 =18
             M2 =16.   T2=9.    D2=?

               M1×T1×D1=M2×T2×D2
                15×8×18 = 16 ×9 ×D2
                15 ×8 ×18/16 ×9=D2
                                        15 = D2
                                        D2= 15 दिवस
A) 10 मजूर रोज 6 तास काम करुन एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?(उकल 4)
B) 12 मजूर रोज 7 तास काम करुन एक काम 20 दिवसात पूर्ण करतात.तर तेच काम 21 मजूर रोज 10 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील ?(उकल 8)
C) 35 मजूर रोज 5 तास काम करुन एक काम 30 दिवसात संपवितात. तर तेच काम 25 मजूर रोज 10 तास काम करुन किती दिवसात पूर्ण करतील?(उकल 21)
D) 28 मजूर रोज 8 तास काम करुन एक काम 25 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम  40 मजूरांना  20 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल?(उकल 7)
E) 18 मजूर रोज 12 तास काम करुन एक काम 30 दिवसात संपवितात. तेच काम 20 मजूरांना 36 दिवसात संपवायचे असल्यास रोज किती तास काम करावे लागेल? ( ( (उकल9 )

Comments

  1. अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही उदाहरणे सोडून देतात. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने स्कॉलरशिप धारण करण्याची अत्यंत चांगली पद्धत आहे. धन्यवाद सर.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

1)सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? उकल: 1 ही सर्वात लहान नैसर्गिक संख्या आहे. 2)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती? उकल: सर्वात लहान पूर्ण संख्या 0 आहे. 3)सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या कोणती? उकल: सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या -1 आहे 4) मूळही नाही व संयुक्तही नाही अशी संख्या कोणती? उकल: 1 ही  संख्या मूळही नाही व संयुक्तही नाही . 5)1 ते 100 पर्यंत किती मूळ संख्या आहेत ? उकल: 1 ते 100 पर्यंत 25 मूळ संख्या आहेत.   
  7 म.सा.वि. व ल.सा.वि.  1)तीन घंटा अनुक्रमे 9 सेकंद, 12 सेकंद व 15 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ? उकल: 9=3×3 12=2×2×3 15=3×5 म.सा.वि.=3 ल.सा.वि.= म.सा.वि.× असाधारण विभाजक               =3×3×2×5               =9×2×5               =18×5              =90 सेकंद 1तास =3600 सेकंद 3600/90=40वेळा 2)तीन घंटा अनुक्रमे 8 सेकंद,12 सेकंद व 16 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 75 वेळा) 3) तीन घंटा अनुक्रमे 10 सेकंद,15  सेकंद व 20 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 60 वेळा) 4) तीन घंटा अनुक्रमे 12 सेकंद,18 सेकंद व 24 सेकंदाच्या फरकाने टोले देतात.तर एका तासात त्या तिन्ही घंटा किती वेळा एकाच वेळी टोले देतील ?(उकल 50 वेळा)
6 क्षेत्रफळ समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ=1/2×समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज×उंची 1)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 8.5 सेमी व 11.5 सेमी आहे.त्याची उंची 4.2 सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा? उकल: समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ                   =  1/2×समांतरबाजूंच्यालांबींचीबेरीज×उंची                    =1/2×(8.5+11.5)×4.2                     = 1/2×20×4.2                      =10×4.2                       =42.0                        =42 चौ.सेमी 2)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंची लांबी अनुक्रमे 7  सेमी व 8  सेमी आहे.त्याची उंची 6  सेमी आहे,तर त्या चौकोनाचे क्षेत्रफळ काढा?(उकल 45 चौ.सेमी.) 3)एका समलंब चौकोनाच्या समांतर बाजूंच...