विषय:- गणित इयत्ता :- आठवी घटक :- 2) काळ काम
श्री. यशवंत टकले (विद्याधाम हायस्कूल कान्हूर मेसाई, ता. शिरूर, जि. पुणे )
1) सोनु एक काम 15 दिवसात करतो.सोनु व मोनु दोघे मिळून तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात. तर मोनु तेच काम किती दिवसात पूर्ण करील?
उकल: मोनुला काम पूर्ण करण्यास लागणारे दिवस = गुणाकार/दिवसांची वजाबाकी
=15×6/15-6
=90/9
=10 दिवस
A) सोनु एक काम 30 दिवसात पूर्ण करतो.सोनु व मोनु दोघे मिळून तेच काम 20 दिवसात पूर्ण करतात.तर मोनुला एकट्याला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील?(उकल 60)
B) सोनु एक काम 60 दिवसात पूर्ण करतो.सोनु व मोनु दोघे मिळून तेच काम 35 दिवसात पूर्ण करतात. तर मोनुला एकट्याला ते काम पूर्ण करण्यास किती दिवस लागतील? (उकल 84)
C) सोनु एक काम 24 दिवसात पूर्ण करतो. सोनु व मोनु दोघे मिळून तेच काम 16 दिवसात पूर्ण करतात .तर मोनु एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल? (उकल 48)
D) सोनु एक काम 15 दिवसात पूर्ण करतो.सोनु व मोनु दोघे मिळून तेच काम 6 दिवसात पूर्ण करतात.तर मोनु एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल ?(उकल 10)
very good work sirji
ReplyDeleteThanks sir
ReplyDelete90
Delete